थकबाकीचे बिल न भरणाऱ्या शेतकऱ्याला हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील रैनापुर गावात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी रैनापुर गावातील सोमशेखर या शेतकऱ्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे . घराचे थकीत बिल देण्यावरून शेतकरी सोमशेखर आणि हेस्कॉम कर्मचारी यांच्यात वाद झाला. शेतकरी सोमशेखर यांच्याकडे 25 हजार रु . घरांच्या बिलाची थकबाकी असून बिल न भरल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी वीज तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र सततच्या पावसामुळे व दुष्काळामुळे शेतकरी अतोनात अडचणीत सापडल्याने शेतकरी सोमशेखर यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. मात्र, शेतकऱ्यांच्या शब्दाची पर्वा न करणाऱ्या हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी वीज तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शेतकरी आणि हेस्कॉम कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. हाणामारीत हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी हाताने , काठीने डोक्यावर, हातावर व छातीवर वार केल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकरी सोमशेखर यांच्यावर शिवानंद पासिगार, आसिफ नदाफ, शिवकुमार शिरसंगी , बासू गनिगेर, महांतेश अंगडी, निंगाप्पा कमतगी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यरगट्टी पोलीस ठाण्यात हेस्कॉम कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments