Belagavi

श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने पर्वादिराज पर्युषण पर्वानिमित्त महाप्रसादाचे आयोजन

Share

बेळगावच्या श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने, पर्वादिराज पर्युषण पर्वानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .  दरवर्षीप्रमाणे यंदाही , बेळगावमधील पांगुळ गल्लीतील श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने पर्वादिराज पर्युषण पर्वानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

प . पू . साध्वीजी पुण्यवतिश्रीजी , आणि साध्वीजी श्री आत्मरतिश्रीजी यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
याविषयी माहिती देताना राजकुमार खोडा यांनी सांगितले कि आम्ही दरवर्षी प्रमाणे आम्ही पर्युषण पर्वाच्या सांगतेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले आहे . यासाठी आम्ही सर्वाना आमंत्रित केले आहे . सुमारे ५ ते ६ हजार लोकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे . जैन धर्माच्या प्रथेनुसार कानडा लसूणचा वापर न करता महाप्रसाद बनवण्यात आला आहे . तरी यांचा सर्वानी लाभ घ्यावा सांगितले .

यावेळी , श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे पदाधिकारी , मंदिर ट्रस्टी आदी उपस्थित होते .

Tags: