महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक विद्यार्थी शिकत असलेल्या कन्नड प्राथमिक शाळांना महाराष्ट्र सरकार कन्नड भाषेतील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करत नाही. याकडे कर्नाटकने लक्ष द्यावे, अशी मागणी युवा विकास संघाचे संस्थापक श्रीधर बिज्जरगी यांनी केली.
बेळगाव मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना युवा विकास संघाचे संस्थापक श्रीधर बिज्जरगी म्हणाले की, सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक विद्यार्थी शिकत असलेल्या कन्नड प्राथमिक शाळांना नलिकली मजकूर पुरविण्यात यावा. महाराष्ट्र सरकार आपल्या प्रदेशातील कन्नड शाळांना कन्नड भाषेतील नलिकली मजकूर न पुरवता मराठी भाषेत पुरवत आहे. .
मराठीतून कन्नड भाषांतर करून कन्नड शिकवणाऱ्या कन्नड शिक्षकांची दैना उडत असून कन्नड शाळांतील विद्यार्थ्यांना मिळत असलेली सापत्नभावाची वागणूक महाराष्ट्र सरकारने त्वरित थांबवावी, महाराष्ट्रातील कन्नड शाळांमध्ये कन्नड पाठ्यपुस्तकांशिवाय मराठीत शिकणाऱ्या मुलांच्या दुरवस्थेवर तोडगा काढण्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील कन्नड शाळांना तातडीने नलिकली पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस युवा विकास संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.


Recent Comments