बेळगाव शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावरील फुटपाथवर अतिक्रमण करणारे व्यापारी, फुलांचे व्यापारी यासह फूटपाथ व्यावसायिकांवर आज कारवाई करण्यात आली आहे.
बेळगाव उत्तर वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयासमोरील व एपीएमसी मार्केट रोड वरील फुटपाथ व्यावसायिकांना हटविण्यात आले असून निर्दिष्ट ठिकाणी व्यवसाय करण्याचे सूचित केले आहे.
पोलिस कर्मचारी अब्दुल नाईक आणि बसवराज बुकनट्टी यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.


Recent Comments