Bailahongala

इन न्युजचा इम्पॅक्ट : नेगीनाळ ग्रामपंचायतीविरोधातील आंदोलन यशस्वी

Share

दलित समाजाच्या 25% अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप करून युवा कर्नाटक भीमसेना युवा शक्ती संघटनेने नेगीनाळ ग्रामपंचायतीविरोधात आंदोलन छेडले होते . त्यांच्या आंदोलनाला यश आले असून बैलहोंगल तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन , कारवाई करण्याचे आश्वासन दिले . हा आहे इन न्युजचा इम्पॅक्ट

युवा कर्नाटक भीमसेना युवा शक्ती संघटनेने नेगीनाळ ग्राम पंचायतपीडीओ ज्योती उप्पिन आणि सचिव स्नेहा हिरेमठ आणि नेगीनाळ ग्राम पंचायत अध्यक्षाविरोधात आंदोलन छेडून दलितांसाठी येणाऱ्या २५ % सरकारी अनुदानाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला . ही बातमी

इन न्यूज बेळगाव वाहिनीवर प्रसारितहोताच , बैलहोंगलचे ईओ आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी धनादेशाद्वारे नुकसान भरपाई आणि पीडितांना न्याय दिला आणि अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली.

IN NEWS वाहिनीचे आंदोलकांनी अभिनंदन केले आहे .

Tags: