भारतीय गिर्यारोहण महासंघामध्ये मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बेळगावच्या प्रकृती अलगुडेकर हिने नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर खोऱ्यातील सर्वोच्च शिखरांच्या पर्वतारोहणाच्या प्रयत्नात ६०६७ मीटर उंचीचा पर्वत चढून विशेष कामगिरी केली आहे. .
भारतीय पर्वतारोहण महासंघ (IMF) च्या आठ सदस्यीय संघाने हिमाचलच्या शिंकुला प्रदेशात आणि जम्मू आणि काश्मीरच्या दक्षिण-पश्चिम भागातील सर्वात उंच परंतु अज्ञात बर्फाळ शिखर सर केले , जे 60 ते 90 अंश सरळ होते आणि अंदाजे 6,067 मीटर उंचीवर ते पोहोचले होते.
बेळगाची प्रकृती अलगुडेकर ही या संघातील एक ही एकमेव महिला सदस्य असून हा पर्वत चढणारी पहिली महिला आहे. याआधी हिमालय पर्वतराजीतील अनेक पर्वत चढण्याचा अनुभव प्रकृतीला आहे आणि तिने आपल्या साहसी कौशल्याने भारताची कीर्ती वाढवली आहे.


Recent Comments