सध्या काढणी सुरू असलेल्या रताळ्याच्या पिकाला पावसाचे ग्रहण लागले आहे. अनेक ठिकाणी शिवारात रताळी काढणीची लगबग सुरू आहे मात्र पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडल्याने सर्वच शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत होते. परंतु रताळी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अतिवृष्टीचा यंदा फटका बसला असून रताळी पीक धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणची रताळी पिके पाण्याखाली गेली असून प्रचंड मेहनत घेऊनही पिकविलेले पीक हाताशी न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट येत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भागवता आलेला नाही, अशी अवस्था आहे. कर्जाऊ रक्कम घेऊन लागवड केलेली रताळी हाताशी न आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. शिवाय बाजारातदेखील रताळ्याचा दर पडलेला असून अपेक्षेपेक्षा केवळ २५ टक्के पीक हाती लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात अधिक घट झाली असून रताळी उत्पादक शेतकरी रघु जाधव यांनी इन न्यूज शी बोलताना याबाबत धिक माहिती दिली आहे.
पावसामुळे ओढवलेल्या संकटात शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्च काढणे देखील अवघड झाले असून लागवडीसाठी केलेले ट्रॅक्टरचे भाडे, शेणखत, मजुरी, रासायनिक खत, किटनाशक यासाठी मोठ्या प्रमाणात केलेला खर्च देखील पाण्यात गेला आहे.


Recent Comments