Belagavi

एस.निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

Share

बेळगावच्या एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस उत्पादकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

एस.निजलिंगप्पा शुगर कंपनी, डिफ्टेक टेक्नॉलॉजीज आणि स्प्रे इंजिनिअरिंग उपकरणे यांच्या सहभागातून आयोजिण्यात आलेल्या या कार्यशाळेत साखर उत्पादन क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानावर आधारित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक सी. बी. पाटील हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, साखर कारखानदारांनी कार्यक्षमतेने काम करावे यासाठी साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी, उच्च दर्जाच्या साखर उत्पादनासाठी सातत्याने कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. गेल्या काही दशकांमध्ये कारखान्यांमध्ये अनेक बदल घडले असून आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यांच्या योग्य वापरामुळे कारखाने अधिक चांगले होत असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक विजयेंद्र सिंग म्हणाले, भारताच्या आर्थिक विकासात साखर कारखानदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चांगले आधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ वापरून कारखाने चांगली प्रगती करू शकतात, असे ते म्हणाले.

या चर्चासत्रात साखरेचा दर्जा आणि शुद्ध साखर उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर सुमारे 9 तांत्रिक लेख सादर करण्यात आले.

या कार्यक्रमात. आर. व्ही, वाटणाळ, विवेक वर्मा, डॉ. एम. बी. लोंडे, वि. के. राटे, जितेंद्र चव्हाण, विक्रमसिंह शिंदे यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यातील 180 हून अधिक कारखान्यांचे तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags: