Banglore

टिपू सुलतानविरोधात आमदार यत्नाळांचे वादग्रस्त विधान

Share

भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळांनी टिपू सुलतानबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील एका कार्यक्रमात आमदार बसनगौडा पाटील यत्नाळांनी टिपू सुलतान बाबत वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. टिपू सुलतानने लाखो हिंदूंची हत्या केली, असे सांगत टिपू सुलतान संदर्भात अनेक वादग्रस्त विधाने केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आपण केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बोलताना ते म्हणाले, मी केलेल्या विधानामुळे माझ्यावर केस दाखल झाली तरी हरकत नाही. माझे बोलणे नीट रेकॉर्ड करा. माझ्यावर आधीच ३६ ते ३७ तक्रारी दाखल आहेत. आता मुधोळ मध्येही चार पाच गुन्हे दाखल केले आहेत. मी हिंदू आहे. मी घाबरणाऱ्यातला नाही आणि षंढही नाही, अशी रोखठोख प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Tags: