राज्याच्या विकासासाठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी आवश्यक आहे, असे हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी सांगितले.

आज हुक्केरी शहरातील पीएलडी बँक सभा भवन येथे भाजप सदस्यत्व अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना ते म्हणाले कि , राज्य सरकारच्या हमी योजनांमुळे विकास रखडला आहे, हमीभावाबाबत लोकांचा भ्रमनिरास झाला असून, मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जात नाही . येत्या काळात भारतीय जनता पक्षाला राज्याची सत्ता मिळवायची असेल तर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हातमिळवणी करून आतापासूनच सदस्यत्व मोहीम सुरू करावी, असे ते म्हणाले.
यावेळी भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सतीश अप्पाजीगोळ, हुक्केरी मंडळाचे अध्यक्ष राचैय्या हिरेमठ, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नेर्ली, ऍड . प्रकाश मुतालिक, अमृता कुलकर्णी, सत्यप्पा नाईक, डी.एम.पाटील, शीतल बाली, गुरु कुलकर्णी, परगौडा पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments