युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत भाऊ राहुल जारकीहोळी यांना युवक पाठिंबा देतील, असा विश्वास चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
त्यांनी शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. भाऊ राहुल जारकीहोळी हे युवक काँग्रेसची निवडणूक लढवत आहेत. लोकप्रतिनिधींकडून सर्व आमदारांना विश्वासात घेतले जात आहे. निवडणूक प्रक्रियाही ऑनलाइन असल्याने आम्ही तरुणांना यापूर्वीच फोनवरून आवाहन केले आहे. त्यांनी भावाला शुभेच्छा दिल्या.
चिक्कोडीच्या शैक्षणिक विकासाबाबत यापूर्वीच डीडीपीआयसोबत बैठक झाली आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पुन्हा एकदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments