Belagavi

बबन भोबे मित्रमंडळातर्फे व्हीलचेअरचे वितरण

Share

बेळगावमधील बबन भोबे मित्रमंडळातर्फे आई-वडिलांच्या स्मरणार्थ व्हीलचेअर वितरित करण्यात आली.

सैनिक नगर येथील जीवन आधार आश्रमात समाजसेवक अनिल गवि यांच्या हस्ते आश्रमाचे अध्यक्ष विल्सन कारवाले यांच्याकडे व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली. बबन भोबे यांच्या आई – वडिलांच्या स्मरणार्थ सदर व्हीलचेअर वितरित करण्यात आली.

यावेळी शाळा क्रमांक २२ चे मुख्याध्यापक एल. एस. जैनोजी, वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विल्सन कारवाले, सुहास शिंदे, टी. के. मंडोळकर, दीपक पावशे आदी उपस्थित होते.

Tags: