हुबळी तालुक्यातील इंगळगी गावात तरुणाला सर्पदंश झाला . त्यानंतर त्या सापाला मारून त्याच्यासहित पितापुत्रांनी रुग्णालयात गाठल्याची घटना घडली आहे .
पिता-पुत्र भुईमूग वेचण्यासाठी गेले असता ही घटना घडली. फक्कीराप्पा अंनिगेरी नावाच्या तरुणाला साप चावला आणि फक्कीराप्पाने लगेचच डोके चिरडून सापाला मारले. वडील इराप्पा त्या सापासह तरुणाला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. फक्कीराप्पा यांनी डॉक्टरांना साप दाखवला आणि त्या सापाने चावा घेतल्याचे सांगितले त्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केले.


Recent Comments