Belagavi

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मार्कंडेयमध्ये कोसळली लॉरी

Share

संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या लॉरी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने लॉरी पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या मार्कंडेय नदीपात्रात कोसळली.

राष्टीय महामार्गालगत असलेल्या मार्कंडेय नदीत लॉरीला जलसमाधी मिळाली असून बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावाजवळील मार्कंडेय नदीपात्रात हा अपघात घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकमधून उडी मारून आपला जीव लॉरी चालकाने वाचवला आहे.

सदर लॉरी संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येत होती. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या माध्यमातून लॉरी बाहेर काढली. या घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags: