केएएसच्या फेरपरीक्षेचा खर्च कर्नाटक लोकसेवा अधिकाऱ्यांच्या पगारातून कापला जावा, अशी मागणी भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना भीमाप्पा गडाद म्हणाले, कर्नाटक लोकसेवा आयोग केपीएससी फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहे, फेरपरीक्षेसाठी 6 ते 7 कोटी रुपये लागतील, तो खर्च कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या पगारातून कापला जावा, कर्नाटक लोकसेवा आयोगाकडून जनतेच्या कराच्या पैशाचा गैरवापर केला जात आहे, कर्नाटक लोकसेवा आयोग रद्द करून राज्य सरकारने आयोग चालवावा अशी मागणी करत अधिकाऱ्यांकडून याची वसुली करण्यात आली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


Recent Comments