चिकोडी तालुक्यातील कब्बूर येथे पाण्याची टाकी बांधण्याचे कामकाज सुरु असून या कामकाजासाठी उभ्या असलेल्या जेसीबीच्या समोरील बाजूत अडकून एका २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

२ वर्षीय गोंडस चिमुरडीचा नाव भूमिका रमेश कोकनूर असे आहे. नियतीने भूमिकासोबत विचित्र खेळ खेळाला असून खेळाच्या नादात असलेल्या या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे. चिक्कोडी तालुक्यातील हनुमान नगर येथील बागेत नगरपंचायतीच्या वतीने रमेश कुकनूर यांच्या घरासमोरील रस्त्यालगतच्या पाईपलाईनसाठी जमीन खुदाईचे कामकाज सुरु आहे. याठिकाणी पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यासाठी जेसीबी उभारण्यात आली आहे. मात्र या जेसीबीच्या समोरील बाजूला असणाऱ्या भागात सदर चिमुरडी पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिचाय्वर कब्बूर प्राथमिक केंद्रात उपचार सुरु करण्यात आले मात्र उपचाराविनाच तिचा दुर्दैवी अंत झाला आहे.
हि घटना घडून जवळपास एक आठवडा उलटूनही नगरपंचायत अधिकारी किंवा कंत्राटदारांनी कोकनूर कुटुंबीयांची साधी भेट घेण्याची तसदीही घेतली नाही. गावातील अनेक लोकांनी येऊन आपले सान्तव्न केले परंतु नगरपंचायत नगरपंचायत अधिकारी किंवा कंत्राटदारांनी आमच्या कुटुंबीयांची भेटही घेतली नाही. जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रसंग ओढवला असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे २ वर्षीय बालिकेला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. मात्र या घटनेनंतर नगरपालिका प्रशासनाने याची दखल देखील घेतली नाही, याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.


Recent Comments