राज्य परिवहन बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याने चालक व वाहकाने बस थेट धारवाड जिल्हा रुग्णालयात आणल्याची घटना धारवाड येथे घडली आहे.
दांडेलीहून धारवाडला येणाऱ्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. उत्तर कन्नड जिल्ह्यातील हल्याळ येथून बसप्रवास करणाऱ्या प्रवाशाला वाटेतच हृदयविकाराचा झटका आला. हे पाहून चालक व वाहकाने बस थेट धारवाड जिल्हा रुग्णालयात नेऊन प्रवाशावर उपचार केले. मात्र, उपचाराअभावी प्रवाशाचा मृत्यू झाला. सदर प्रवाशाबाबत अद्याप संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.


Recent Comments