बेळगाव मधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचा काल रात्री उशिरा रेल्वेखाली मृत्यू झाला.
विजयपूर जिल्ह्यातील तालिकोट तालुक्यातील गणसिद्ध नंदगोळ असे मृताचे नाव आहे. बेळगावमध्ये मजगाव येथे आपल्या कुटुंबासह सदर व्यक्ती राहत होती. तसेच एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही घटना मजागाव येथील रेल्वे रुळाजवळ घडली असून ही आत्महत्या की घातपात आहे कि अपघात आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments