Belagavi

विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Share

जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते बेळगावात आयोजिण्यात आलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.

विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि जिल्हा विश्वकर्मा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कालिकांबा आणि विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपास्थीत मान्यवरांनी अभिवादन केले.

2016 मध्ये सर्वप्रथम सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. विश्वकर्माने जगातील सर्व गोष्टी निर्माण केल्या. अशा व्यक्तीची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करावी याप्रमाणेच या समाजाने शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढे यावे, विश्वकर्मा जयंतीउत्सव देशभर साजरा झाला पाहिजे, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, वैशाली पत्तार, विनय नवलगट्टी, परशुराम ढगे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, विश्वकर्मा समाजाचे नेते आदी उपस्थित होते.

Tags: