Belagavi

२२ सप्टेंबर रोजी पंचमसाली समाजाची भव्य परिषद

Share

पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय पंचमसाली समाज भव्य महापरिषदेची बैठक 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली.

बेळगावमधील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हि माहिती दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 22 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीबाबत आमच्या समाजातील कायदेतज्ज्ञांशी चर्चा न केल्यास महापरिषदेच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महासभेला राज्यातील सर्व पंचमसाली समाज व मालेगौडा समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचमसाली समाजाला 2अ आरक्षण देण्यासाठी आम्ही 2012 पासून लढा देत आहोत. आमच्या समाजाची मते मिळवून सत्तेवर येणाऱ्या सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचमसाली समाजाला 2अ आरक्षण देण्याबाबत आमच्या समाजाच्या 20 आमदारांनी अधिवेशनात चर्चा केलेली नाही. आमच्या समाजाने आमदारांच्या घरी पत्र अभियान केले. मात्र आजपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात चर्चा व्हावी यासाठी सभापतींना पत्र लिहावे लागले. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन पंचमसाली समाजाच्या आमदारांनी सभागृगावर बहिष्कार टाकणे गरजेचे होते. पण आमदारांनी अशी कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता कायदेशीर लढाई सुरू करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला आर.के.पाटील, आर.सी.पाटील, गुंडू पाटील, मल्लनगौडा पाटील, रवींद्र जिनराळे आदी उपस्थित होते.

Tags: