Belagavi

श्री महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संघ प्रगतीच्या मार्गावर

Share

आम्ही संस्थेचे मालक नाही तर ग्राहकांनी गुंतवलेल्या पैशाचे संरक्षक आहोत. संस्थेचे संचालक देखील हीच मानसिकता बाळगत असून अवघ्या दीड वर्षात सर्व श्रेणीतील ग्राहकांशी कमर्चाऱ्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे, अशी प्रतिक्रिया श्री महांतेश कवटगीमठ सौहर्द सहकारी संघाचे संस्थापक महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केली.

श्री महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संघाच्या बेळगावच्या मुख्यालयात शनिवारी झालेल्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना संस्थेचे संस्थापक महांतेश कवटगीमठ म्हणाले, गदग येथील सिद्धनगौडा पाटील यांनी सुरु केलेल्या सहकार चळवळी अंतर्गत रत्नाप्पाण्णा कुंभार, अप्पनगौडा पाटील यांसारख्या अनेक ज्येष्ठांनि संस्था स्थापन करून इतिहास रचला. श्री महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संघाची स्थापनाही अशाच हेतूने झाली असून कमी कालावधीत चांगली सेवा देऊन सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडण्याचे काम या संस्थेने केले. हि संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून यामध्ये व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

या संस्थेचे आर्थिक वर्षात ७९० सभासद असून 36 लाख 61 हजार भाग भांडवल, 12 कोटी 91 लाख 31 हजार ठेवी, 13 कोटी 46 लाख 34 हजारांचे खेळते भांडवल अशी संस्थेची आर्थिक स्थिती आहे. संस्थेने कमी कालावधीत चांगली सेवा देऊन लोकांचा विश्वास संपादन करून प्रगतीकडे वाटचाल केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर, संचालक लक्ष्मेश हुंडेकर, सी.आर. पाटील, अरुण माने, प्रमोद कोचेरी, सतीश अप्पाजीगोळ , शिवानगौडा शिवयोगीमठ, डॉ.विनिता मेटगुडमठ, डॉ.संतोष पाटील आणि संस्थेचे व्यवस्थापक मल्लिकार्जुन कांबळे आदींसह संस्थेचे भागधारक ग्राहक यासह मान्यवरांची उपस्थिती होती. गायत्री बडिगेर यांनी स्वागत, तर राजेश्वरी चव्हाण यांनी आभार मानले.

Tags: