मंगळूरमध्ये, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंटवाल शहरात एका सोशल मीडिया पोस्टच्या विरोधात निदर्शने केली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि जलद कृती दल (RAF) तैनात करण्यात आले आहे. अनेक आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिकेड्स तोडून समाजात अशांतता निर्माण केली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एसपी यतीश एन यांनी सांगितले.
तसेच आज ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ. आंदोलन करून शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले.


Recent Comments