बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील उगारगोळ जवळील श्री क्षेत्र रेणुका यल्लम्मा मंदिराच्या हुंडी मोजणीचे काम गुरुवारी पूर्ण झाले असून, मंदिराच्या दानपेट्यांमध्ये , १ कोटी ४८ लाख ९५ हजार ४०४ रुपये जमा झाले आहेत.
25 मे ते 20 जुलै (55 दिवस) यल्लम्मा देवी मंदिरात आलेल्या भाविकांनी 1.35 कोटी रुपये, 11.79 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 1.80 लाख रुपये किमतीचे चांदीचे साहित्य दान केले आहे . यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, मंदिराचे कार्यकारी अधिकारी, मुजराई विभागाचे सहायक आयुक्त कार्यालयीन अधीक्षक, सवदत्ती तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी, सवदत्ती ठाणे पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीन दिवस हुंडीची मोजणी करण्यात आली.

यावेळी सवदत्ती यल्लम्मा मंदिराचे कार्यकारी अधिकारी एसपीबी महेश, वाय. कल्पनवर, कोल्लप्पा गौडा गंदिगवाड , लक्ष्मी हुली, नागरत्ना चोलिन, बालेश अब्बाई, एम.एस.यलिगार , एम.पी.दयमनगौडर , प्रभू चबना, डी रावणकोल, डीडी नागनगौडर , मंदिराचे कर्मचारी आणि सिंडिकेट बँकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments