Belagavi

दोषी दुसरेच तर मनपाला २० कोटींचा दंड का? : माजी आम. रमेश कुडची

Share

कामकाज करणारे दुसरेच होते तर मग दंडात्मक कारवाईची टांगती तलवार मनपावर का? असा प्रश्न माजी आमदार आणि माजी महापौर रमेश कुडची यांनी उपस्थित केला आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या २० कोटींच्या नुकसान भरपाईपरकरणी माजी महापौर आणि माजी आमदार रमेश कुडची यांनी नाराजी व्यक्त केली आहे. २० कोटींची भरपाई मनपाच्या डोक्यावर लादण्यात आली आहे. परंतु या सर्व प्रक्रियेमागे आयुक्तांची भूमिका महत्वाची आहे. नुकसानभरपाईदाखल मनपाने जागा मालकांना जागा परत देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सर्व गोष्टी कोणत्या नियमानुसार होत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सर्वप्रथम या प्रक्रियेत भूसंपादनच नियमबाह्य पद्धतीने करण्यात आले. २०१९ मध्ये स्मार्ट सिटीने मनपाकडून ना हरकत प्रमाणपत्र मागविले. २०२२ मध्ये मनपाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. भूसंपादन एकीकडॆ तर रास्ता कामकाज एकीकडे अशापद्धतीने हे कामकाज करण्यात आले. याप्रकरणी बाळासाहेब पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आणि नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. मनपा आणि अधिकाऱ्यांच्या या चुकीची शिक्षा जनतेने का भोगावी ? असा प्रश्नही माजी आम. रमेश कुडची यांनी उपस्थित केला.

Tags: