Belagavi

बेळगाव-बेंगळुरू वंदे भारत सुरु करण्याची जबाबदारी माझी : खास. जगदीश शेट्टर

Share

खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या काही दिवसांत राजीनामा देतील मात्र ते कधी देतील याची काही शाश्वती नाही.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासंदर्भात विमानतळाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, 14 एकर जमीन यापूर्वीच संपादित करण्यात आली असून, अधिकाऱ्यांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बेळगाव पुणे वंदे भारत ट्रेन आठवड्यातून तीन दिवस सेवारत राहणार आहे. मात्र संपूर्ण आठवडाभर हि सेवा सुरु करून बेळगाव ते बेंगळुरू सेवा देखील सुरु करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मुख्यमंत्री राजीनामा देतील हे निश्चित आहे. पण ते कधी राजीनामा देतील, याची शाश्वती नाही. नागमंगल येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दंगलीत हिंदूंवर हल्ला करण्यात आला. या घटनेवेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. उद्या हीच परिस्थिती काँग्रेस आमदारांच्या घरी देखील उद्भवेल. अटक केलेल्या हिंदू तरुणांची सुटका कारण्यासहीत देशद्रोह्यांना शिक्षा देण्यात यावी, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण थांबवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी., असे ते म्हणाले.

सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसने देशावर आणीबाणी लादून लोकशाहीची हत्या केली. विरोधी पक्षाला तुरुंगात टाकले आणि घटना दुरुस्ती केली. नागरिकांवर सातत्याने अत्याचार केले गेले. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतही दुरुस्ती करण्यात आली. राज्यघटनेवर एवढा हल्ला चढवणारी काँग्रेस राज्यघटना जणू त्यांच्या घरची संपत्ती असल्यासारखे वागत आहे, ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका त्यांनी केली.

Tags: