Belagavi

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हॉस्टेल आणि निवासी शाळेतील बाह्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Share

सेवा सुरक्षेच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळा बाह्य कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज बेळगाव मध्ये आंदोलन करण्यात आले. सेवा सुरक्षा आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह व निवासी शाळा बाह्य कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

दर महिन्याच्या 5 तारखेला पगार मिळावा, थकीत पगार देण्यात यावा, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या देखभालीसाठी 10 लाख रुपये देण्यात यावेत. स्वयंपाकघरात सुरक्षितता उपकरणे द्यावीत, खात्यावर थेट पगार जमा करावा, साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, कामगार विभागाच्या नियमानुसार किमान वेतन 31 हजार रुपये यासह विविध 21 मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्नाटक राज्य शासकीय वसतिगृह व निवासी शाळा बाह्य कंत्राटी कर्मचारी युनियन बेंगळुरू यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा समिती बेळगावचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दळवाई यांनी दिली.

यावेळी लक्काप्पा कांबळे, श्रीकांत सुनक्की, लगमण्णा सर्जन, रमेश पाटील आदींचा सहभाग होता.

Tags: