छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा ३५० वर्षे उलटूनही आजही जिवंत आहे. शिवकालीन इतिहासाची आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात विशिष्ट अशी जागा आहे. इतिहासाच्या पानातील पावनखिंडीचा इतिहास हा अंगावर रोमांच उभा करणारा आहे. हाच इतिहास बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आंबेवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सवाने पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने जागा केला आहे.. पाहुयात याची एक झलक…
छातीची ढाल करून बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैन्य यांनी पावनखिंड गाजविली. पावनखिंडीचा थरारक इतिहास आजही मराठ्यांच्या मनात जागा आहे. सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवरायांना सुखरूपपणे विशालगडावर पोहोचविण्यासाठी जीवाची बाजी करणारे बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल सैन्य.यांच्या संपूर्ण इतिहासाची झलक आंबेवाडी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सादर केली आहे. मदन शहापूरकर यांच्या संकल्पनेतून हा इतिहास पुन्हा एकदा जागृत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.


Recent Comments