Vijayapura

दारूच्या नशेत मित्राची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

Share

विजयपुर शहरातील महानगरपालिकेजवळ दारूच्या नशेत एका व्यक्तीची हत्या केल्याच्या घटनेच्या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती विजयपूरचे एसपी हृषिकेश सोनवणे यांनी दिली.

समीर बडिगर (35) असे दुर्दैवी मृत तरुणाचे नाव असून विजय आणि लक्ष्मण नावाच्या दोन मित्रांनिच आपल्या मित्राचा दारूच्या नशेत खून केला असून मद्यधुंद अवस्थेत समीरच्या अंगावर सातहून अधिक वार करण्यात आले होते. खून का झाला, याचा तपास सुरू असल्याचे विजयपूरचे एसपी हृषिकेश सोनवणे यांनी सांगितले.

Tags: