विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील शिरनाळ आरोग्य केंद्रात दारू पिऊन रुग्णालयात येऊन गोंधळ घालणाऱ्या नारायण राठोड या आरोग्य निरीक्षकाला जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे.
विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील शिरनाळ आरोग्य केंद्रात दारू पिऊन गोंधळ निर्माण करणारा नारायण राठोड हा आयुष डॉक्टर नसून आरोग्य निरीक्षक असल्याचे स्पष्टीकरण आयुष विभागाने दिले आहे. णार्यां राठोड याने मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात येऊन धिंगाणा घालत रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. या प्रतापामुळे जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
नारायण राठोड याने असा प्रताप करण्याची हि पहिलीच वेळ नसून यापूर्वीदेखील त्याने व ड्युटी असताना असे अनेक प्रकार केले आहेत. त्याच्यावर महिला रुग्णांना शाब्दिक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्याने केलेल्या या प्रतामुळे निलंबनाची मागणी नागरिक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून होत होती.


Recent Comments