नागमंगल येथे रात्री मशिदीसमोर गणेशभक्तांवर हल्ला करण्यात आला असून हि घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केली आहे.
नागमंगल येथे घडलेल्या घटनेवर धारवाडमध्ये प्रतिक्रिया देताना प्रमोद मुतालिक म्हणाले, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत झालेल्या प्रकारामुळे गणेशमूर्तीला इजा पोहोचली आहे. याचा मुस्लिम समाजाने विचार करावा. मशिदीसमोरून येताना वाद्य वाजवू नये असा नियम आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मागील वर्षीही याच मशिदीसमोर गोंधळ झाला होता, चेलुवरायस्वामींनी या गोंधळाची चौकशी करायला हवी होती. चेलुवरस्वामी हे या गदारोळाचे प्रमुख कारण आहेत. यासंदर्भात आधी बैठक व्हायला हवी होती, या घटनेत मुस्लिम दोषी असून अशा घटना समाजाला कलंक लावणाऱ्या आहेत.
हिंदू धर्मात श्री गणेशाच्या पूजनाने कोणत्याही कामाची सुरुवात केली जाते.मात्र आमच्या देवतेवर अशा पद्धतीने गडगफेक करणे हे निंदनीय आहे. मंड्या येथील मुस्लिमांवर बंदी घालण्यात यावी, मंत्री चेलुवरायस्वामी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या घटनेला सपा आणि चालुवरायस्वामी जबाबदार आहेत. असा आरोप प्रमोद मुतालिक यांनी केला आहे.


Recent Comments