तलवार समाजाला कोणताही संभ्रम न ठेवता एसटीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी बेळगावात तलवार समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तलवार समाजाला दाखले न देण्यासाठी न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याचे सांगून काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे काही तालुका दंडाधिकारी कार्यालयात तलवार समाजातील व्यक्तींना एसटीचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही. या धोरणाचा निषेध करणारे निवेदन आज तलवार समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
न्यायालयाने तलवार समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र देण्यास मज्जाव केल्याने काहींनी संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे तलवार समाजावर अन्याय होत असून यामुळे हा समाज सुविधांपासून वंचित आहे. मात्र न्यायालयात स्थगिती आदेश नसतानाही तलवार समाजाला एसटी जात प्रमाणपत्र दिले जात नाही. न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन अधिकाऱ्यांनी तलवार समाजावर अन्याय केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी मल्लिकार्जुन दळवाई, कुमार गस्ती यांच्यासह तलवार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments