वायव्य परिवहन च्या हुबळीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रियांका एम. यांनी बेळगाव विभागाला भेट दिली.
यावेळी बेळगावच्या स्मार्टसिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका सय्यदा अफ्रिनाबानू बेल्लारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रियांका एम. यांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या बस ऑपरेशन आणि स्वच्छतेची पाहणी केली.बसस्थानकाची उर्वरित कामे लवकर पूर्ण करून इमारत ताब्यात देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बेळगावातील युनिट १ मधील अस्वच्छ परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत स्वच्छता न ठेवल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी राजेश हुद्दार, कार्यकारी अभियंता एस.व्ही. अंगडी, एन.आर. तिम्मरेड्डी, सहाय्यक कार्यकारी अभियंता, विभागीय परिवहन अधिकारी के.के.लमाणी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments