Belagavi

मुख्यमंत्री पदाचा मुद्दा गल्लीबोळात, रस्त्यावर बोलण्याचा विषय नाही : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा हा गल्लीबोळात बोलली जाणारी गोष्ट नाही, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.

बुधवारी बेळगावमध्ये माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाल्या कि , आमचे नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून भक्कम आहेत. आमच्या पक्षात हायकमांड आहे. शिस्तही आहे. मीही पक्षशिस्तीचा शिपाई आहे, अशा बाबी हायकमांड ठरवतात. आमच्या पक्षाचे 135 आमदार ठरवतील, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या .

जोपर्यंत हायकमांड निर्णय घेत नाही आणि निवडून आलेले आमदार निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्रिपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. रस्त्यावर, गल्लीबोळात अशा विषयांवर बोलणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या .

लक्ष्मी हेब्बाळकर या पुढील मुख्यमंत्री होणार असल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांबाबत विचारले असता याला काही किंमत नाही असे उत्तर दिले .

Tags: