Banglore

मुख्यमंत्रीपद बदलाबाबत चर्चा करण्याची नाही गरज : गृहमंत्री जी परमेश्वर

Share

मुख्यमंत्र्यांच्या पदावर चर्चा करण्याची गरज नसल्याचे गृहमंत्री डॉ. जी.परमेश्वर म्हणाले.

बंगळूरमध्ये गृहमंत्री जी परमेश्वर यांनी मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या वक्तव्यावर अंकुश ठेवण्यासाठी हायकमांडला पत्र लिहिण्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना , मीही मुख्यमंत्र्यांच्या पदावर चर्चा करण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्याशिवाय दुसरे काही नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री एम बी पाटील हे विभागीय कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. गृहखात्याशी संबंधित काम असेल तर मी दिल्लीलाही जातो. ते दिल्लीला गेल्याने, मुख्यमंत्रीपदाच्या फायद्यासाठी गेले असे कसे म्हणायचे? याबाबत चर्चा अनावश्यक असल्याचे ते म्हणाले.

Tags: