विजयपूरमध्ये बिबट्या आढळून आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत असून हे व्हिडीओ पाहून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
विजयपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सिंदगी आणि इंडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून इंडी तालुक्यातील संगोगी जवळील एका शेतात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुरून अस्पष्ट दिसत असलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्याची अद्याप खात्री पटली नाही मात्र येथील लोकांनी बिबट्याचे ठसे शेतात दिसल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंदगी व इंडी परिसरात दक्षता घेतली असून काही ठिकाणी पिंजरेही लावले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे विजयपूर जिल्ह्यातील लोक चिंतेत आहेत.


Recent Comments