वंदे भारत रेल्वे आणण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. दिलेल्या आश्वासनाशी मी बांधील असून हुबळी – पुणे पाठोपाठ बेंगळुरू – बेळगाव मार्गावरदेखी वंदे भारत रेल्वे सुरु करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत जी चर्चा आतल्या गोटात सुरू होती, ती आता उघडपणे सुरू आहे, आम्ही सिद्धरामय्यांच्या बाजूने आहोत, ते मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत अशी वक्तव्ये मंत्री आणि काँग्रेस नेते करत आहेत. मात्र पडद्याआड मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा जोरात सुरू आहे. राज्यातील मुडा आणि वाल्मिकी घोटाळ्यात सरकार बुडाले आहे. त्यांचेच आमदार आणि मंत्री एकमेकांचे पाय ओढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस सरकार पडणार आहे. आपल्याच चुकांमुळे राज्य सरकार पडेल, असे भाकीत जगदीश शेट्टर यांनी केले.
बेळगाव महापालिकेच्या आर्थिक दिवाळखोरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी एकटा महापालिकेची आर्थिक सुधारणा करू शकत नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे, अधिकाऱ्यांवर नियंत्रण न राहिल्याने हा प्रकार घडल्याचेही खासदार शेट्टर म्हणाले.


Recent Comments