जुने बेळगावच्या रामलिंग गल्लीतील श्रीगणेशाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यानंतर कर्नाटकातील सीमावर्ती जिल्ह्यात बेळगावमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या धर्तीवर यंदाही चतुर्थीपूर्वी गणेशमूर्ती आणल्या जात असून, आगमनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

गुरुवारी सायंकाळी वडगाव येथील सोनार गल्ली येथून ही श्री मूर्तीची मिरवणूक निघाली. मिरवणुकीत पारंपारिक वेशभूषेतील तरुण-तरुणी सहभागी झाले होते. शिवगर्जना ढोल ताशा पथकाच्या तालावर युवतींनी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल ताशाच्या तालावर भगवे झेंडे देखील फडकत होते . आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी लोकांची रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती .
सोनार गल्ली वडगाव येथून निघालेली मिरवणूक जुन्या बेळगावच्या तेग्गन गल्ली, लक्ष्मीनगर, रामलिंग गल्ली येथे येऊन संपली.


Recent Comments