Belagavi

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगर पालिकेकडून तयारी पूर्ण

Share

उद्या 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव महापौर, उपमहापौर, नगरसेवक व महापालिकेच्या आयुक्तांनी गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावांची पाहणी केली.

उद्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, कपिलेश्वर पूल आदी ठिकाणच्या मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली.

बेळगावच्या महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक आणि महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी गणेश विसर्जनाचा तलाव असलेल्या दक्षिण काशी कपिलेश्वर येथील तलावाची पाहणी केली . रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे, झाडांच्या फांद्या , वायर्स आणि इतर सुविधा वाढवणे आणि गणेश विसर्जनाच्या तलावांची प्राथमिक तयारी पूर्ण
करण्याच्या सूचना दिल्या .


बेळगावमदहये दिड दिवस , 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस आणि 21 दिवस गणपतीची पूजा करतात. त्यांच्या विसर्जन सोयीसाठी महानगरपालिकेने सर्व व्यवस्था केली आहे.


यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती, सदस्य, महापालिका महसूल आयुक्त रेश्मा तालीकोटे विकासक लक्ष्मी निपाणीकर व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags: