गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यान आलेले . गुरुवारी केपीटीसीएल सभागृहात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक पार पडली . गणेश मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत , सातत्याने स्वयंसेवक मंडपात असावेत , बॅनर लावताना आवश्यक ती परवानगी घ्यावी , सण शांततेत आणि उत्साहात साजरे करण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले .

पारंपारिक वाद्यांचा उत्सवाच्या काळात व मिरवणुकीच्या वेळीही वापर करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली . या बैठकीला डीसीपी रोहन जगदीश , मार्केटचे एसीपी संतोष सपनाईक , खडेबाजाराचे एसीपी शेखराप्पा एच , बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर एम बी आदी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते . माजी नगरसेवक नेताजी पाटील , रणजित चव्हाण प पाटील , सुनील जाधव , राहुल जाधव , अशोक चिंडक , रमेश सोनटक्की , आदींसह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच शहरातील सर्व पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षक उपस्थित होते .


Recent Comments