बेळगावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोनवाळ गल्ली येथे श्रीगणेशाचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला .
बेळगावात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. शहरात व परिसरात श्रीगणेशाचा आगमन सोहळा होत आहे. बेळगाव येथील कोनवाळ गल्लीत गुरुवारी सायंकाळी सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाचा श्रीगणेश स्वागत सोहळा पार पडला.

पारंपारिक वेशभूषा परिधान करून लहान मुले, तरुण-तरुणी, मोठ्या उत्साहात गात, नाचत मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशा पथकाच्या गजरात मिरवणुक जल्लोषात पार पडली .


Recent Comments