Belagavi

शांतव्वा महादेवाप्पा तुप्पद यांचे मरणोत्तर त्वचा आणि देहदान

Share

बेळगावच्या टिळकवाडी येथील रहिवासी , शांतव्वा महादेवाप्पा तुप्पद (वय ८१ ) यांचे निधन झाले .

त्यांच्या अंतिम इच्छेनुसार , डॉ . रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून , त्यांचे मरणोत्तर त्वचादान आणि देहदान करण्यात आले . केएलइ संस्थेच्या डॉ .प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या , के एल इ रोटरी स्किन बँकेला त्वचादान तर हुबळीच्या के एल इ जगद्गुरू गंगाधर स्वामीजी मुरुसावीर मठ वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात आले .

कॉलेजचे प्राचार्य , डॉ रामण्णावर ट्रस्टचे कार्यदर्शी डॉ . महांतेश रामण्णावर यांनी त्वचादान आणि देहदान केल्याबद्दल तुप्पद कुटुंबियांचे आभार मानले . मयत शांतव्वा महादेवप्पा तुप्पद याच्या पश्चात २ मुलगे आणि मोठा परिवार आहे .

Tags: