Banglore

विधानसौधजवळ बाईक पेटवलेल्या तरुणानेच पेटवली तहसीलदारांची जीप

Share

चित्रदुर्ग जिल्ह्यात एका तरुणाने चल्लकेरे तहसीलदारांची जीप पेटवून दिल्याची घटना घडली आहे .  चित्रदुर्ग शहरातील गांधी नगर येथे राहणारा पृथ्वीराज हा आरोपी आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लकेरे तहसीलदार कार्यालयासमोर ही घटना घडली. पृथ्वीराजने तहसीलदार रेहान पाशा यांच्या जीपवर पेट्रोल टाकून पेटवून दिले .

यापूर्वी विधानसौधसमोर आपली दुचाकी पेटवून देणाऱ्या पृथ्वीराजने , चल्लकेरे पोलिसांवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या घटनेबाबत चल्लकेरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पृथ्वीराजला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तहसीलदार जीपच्या वर उभे राहून पेट्रोल ओतून पेटवत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

Tags: