Belagavi

कंग्राळी बीके ग्रामपंचायत बैठक अध्यक्ष उपाध्यक्षांविना : सदस्यांनीच घेतली बैठक

Share

गणेशोत्सवकाळात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे आणि गणपती मंडळांना सहकार्य करण्यासाठी तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी कंग्राळी बीके पंचायतीत बैठक बोलावण्यात आली होती मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या बैठकीला गैरहजर राहिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसहित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे .
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीतवर , रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे तसेच गणपती मंडळ सहकार्य करण्यासाठी व

इतर विषय ह्या करिता विशेष मीटिंग बोलवण्यात आली होती , मात्र ग्राम पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी ह्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली . ही मीटिंग घेणे गरजेचे होते त्यामुळे सदस्यानी अध्यक्ष उपाध्यक्षांच्या अनुपस्थतीत बैठक घेऊन , आजपासून रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली .


अनिल पावशे , दादासाहेब , तानाजी पाटील, उमेश पाटील, सुरेश राठोड , पुनम पाटील, रेखा सुतार , कल्पना पवार , भारता पाटील , ग्रामविकास अधिकारी गोविंद आणि इतर बैठकीला उपस्थित होते .

Tags: