Belagavi

खडक गल्ली येथील श्री गणेशाचा आगमन सोहळा

Share

अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आगमन सोहळ्याचे आयोजन करत असून खडक गल्ली येथील श्री गणेश मूर्तींचाही आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

पुण्या – मुंबईच्या धर्तीवर बेळगावमध्येही गणेश चतुर्थीच्या आधीच आगमन सोहळ्याचे आयोजन केले जात असून बेळगावमधील खडक गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही बुधवारी भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन केले होते. महिला, तरुण – तरुणी, आबालवृद्धांच्या पारंपरिक वेशातील गणेशभक्तांनी सर्वांचेच लक्ष वेधले. बुधवारी सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढून श्री गणेशाचा स्वागत सोहळा पार पडला.

Tags: