Vijayapura

विजयपूर – बसवण बागेवाडी येथे शांतता सभा

Share

गणेश चतुर्थी व ईद मिलाद निमित्त विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील डीवायएसपी बल्लाप्पा नंदगावी व सीपीआय गुरुशांतगौडा दाश्याळ यांच्या नेतृत्वाखाली बसवन बागेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता सभा घेण्यात आली.

यावेळी बोलताना डीवायएसपी बल्लाप्पा नंदगावी म्हणाले की, गणेशोत्सव काळात तसेच ईद मिलाद च्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सीसी टीव्ही कॅमेरे बसवून उत्सव शांततेत पार पाडावेत.

सीपीआय गुरुशांतगौडा दाश्याळ म्हणाले की, हे विश्वगुरु बसवण्णांचे जन्मस्थान असून, हिंदू-मुस्लिम असा कोणताही जातीय भेदभाव न राखता सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखावी. दरवर्षी गणेश चतुर्थी हा ईद मिलाद उत्सव शहरासह गावागावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . दोन्ही उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक नीलू नाईक, शंकर गौडा बिरादार, अरविंद सालवडगी, अशोक हरिवाळ, खाजंबर नदाफ यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: