कागवाड शहरातील सुमारे 200 वर्षे जुन्या जागृत गणेश मंदिरात गणपती सहस्त्रनाम अभिषेक कार्यक्रम पार पडला.
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती गाव असलेल्या कागवाड शहरात, पटवर्धन राज्यातील पोणेराव हर्बटराव पटवर्धन सरकार यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या जागृत गणेश मंदिरात सहस्त्रनाम अभिषेक कार्यक्रम पार पडला.
बुधवारी पटवर्धन कुटुंबातील वकील समीर पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातील प्रसिद्ध पुजारी प्रदीप जोशी यांच्या हस्ते सहस्त्रनाम अभिषेक कार्यक्रम पार पडला.
पुजारी प्रदीप जोशी यांनी पूजा पद्धतीची माहिती देताना सांगितले, जागृत गणेश मंदिरात दरवर्षी भाद्रपद शुध्द प्रतिपदेला गणेश नवरात्रीची स्थापना करतात. त्यानिमित्त गणेशाचा सहस्त्रनाम अभिषेक कार्यक्रम होत आहे.
पटवर्धन घराण्याच्या ९वे वारस असलेले वकील समीर पटवर्धन यांनी गणेशाच्या महिमेविषयी सांगितले. हि गणेशमूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे. आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून पटवर्धन घराण्याचे 9 वे उत्तराधिकारी म्हणून आम्ही माझ्या कुटुंबासह गणेशाच्या सहस्त्रवर्तन कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. पुढील तीन दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. यानिमित्ताने दीड दिवसाच्या संस्थान गणेशाची स्थापनाही केली जाते. या गणेशाचे रविवारी विसर्जन केले जाते. हजारोंच्या संख्येने गणेशभक्त येऊन दर्शन घेतात . मंदिराच्या दक्षिणेला एक शिलालेख उभारण्यात आला असून त्यात हे प्राचीन गणेश मंदिर असल्याचा उल्लेख आहे.
त्यांच्या पत्नी सुचित्रा समीर पटवर्धन, मुले इंद्रजीत पटवर्धन, शुभंकर पटवर्धन, सुनीत्रा जोशी, सुभाष कठारे, शशिकांत जोशी, पुजारी प्रदीप जोशी, सारंग जोशी, संकेत जोशी, मनोज गुरव, संजू फिरगन्नावार आदी पुजा सोहळ्यात सहभागी झाले होते.
Recent Comments