Temple

कडोली गावातील श्री कलमेश्वर मंदिरात विशेष महाप्रसाद

Share

श्रावण महिन्यानिमित्त बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील श्री कलमेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त आयोजिण्यात आलेल्या महाप्रसादाचा आस्वाद हजारो भाविकांनी घेतला.

बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील ऐतिहासिक कलमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, फुलांची सजावट, महामंगल आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी कुटुंबासह मंदिरात जाऊन विशेष पूजा केली. यावेळी सहस्र बिल्वार्चन पूजादेखील करण्यात आली.

पावसाच्या रिमझिम सारी बरसत असूनही कलमेश्वर मंदिरात आयोजिण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

यावेळी इन न्यूजशी बोलताना कलमेश्वर मंदिर समितीच्या सदस्यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कलमेश्वर मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून शेकडो वर्षांपासून महाप्रसादाची परंपरा सुरु आहे.

Tags: