उत्तर कर्नाटकात केबल नेटवर्क सुरू करून कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगालमध्ये याचे जाळे पसरवणाऱ्या रिद्धी व्हिजनच्या संस्थापिका निशा छाब्रिया यांना आज जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. आज त्या जरी आमच्यात नसल्या तरी त्यांचे धडाडी, कर्तृत्ववान, परोपकारी व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव नेहमी आमच्या स्मरणात तजेलदारच राहील….
निशा नागेश छाब्रिया या एक अनुकरणीय यशस्वी समाजसेवी व्यक्ती होत्या. केबल नेटवर्किंग क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या निशा छाब्रिया यांचा जन्म ४ ऑगस्ट १९७१ रोजी मुंबईतील बजाज कुटुंबात झाला. आज त्यांना जाऊन एक वर्ष झालं… त्यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात स्थान मिळविलेल्या निशा छाब्रिया यांचे मॉल उभारण्याचे स्वप्न होते. आज त्यांचे स्वप्न साकार होत असून समादेवी गल्ली येथील २५००० चौरस फूट आकारातील ‘निशा इन्फिनिटी’ या मॉलची वास्तुशांती येत्या ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. याचबरोबरच जोयालुकास या ज्वेलरी शॉपचेही उद्घाटन होणार आहे.

आपल्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, लहान मुलांशी असलेले खोडकर नाते, सण – समारंभ करण्याची पद्धत, गरजू – होतकरू लोकांना मदत करण्याचा स्वभाव या सर्व गुणांमुळे आजही त्या आपल्या नेहमीच स्मरणात आहेत. एखाद्यावर जीवापाड मैत्री करण्याचा त्यांचा स्वभाव आणि मुंबईत राहूनही बेळगावच्याच आठवणी जपत, बेळगावच्या विकासासाठी प्रयत्न करणारी निशा आज आपल्यात नाही याचे दुःख आपल्याला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांची जिवलग मैत्रीण भारती हरदी यांनी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सव आला कि बाप्पांच्या मूर्तीची ऑर्डर देण्यापासून मूर्ती घरी आणेपर्यंत तुझी लगबग, रांगोळी, तोरण, पाट, गालिचा, हार… सर्व बारकारीने तयारी.. गाडीच्या ताफ्यासोबतच बच्चे कंपनीची धावपळ, फटाक्यांच्या आतिषबाजीतला तुझ्या घरचा बाप्पा पाहणे याची मजा काही औरच… नऊ दिवसात होणारी आरती, पूजा, स्नेहभोजन,, प्रसाद या सर्वात तुझा हसमुख चेहरा… गणपती विसर्जनानंतर पुन्हा दिवाळीची तयारी.. प्रत्येकाला आवर्जून भेटवस्तू देणे, इतकेच नाही तर रमजान सानातही तुझी भेटवस्तू आवर्जून असायचीच… अशा आठवणीही भारती हरदी यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना..


Recent Comments