Dharwad

राजकीय प्रश्नांना उत्तर देण्यास आर. व्ही. देशपांडेची टाळाटाळ!

Share

अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.व्ही. देशपांडे यांच्या मीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्याच्या वक्तव्याने बराच गदारोळ झाला आणि भाजपने याचा वापर हत्यार म्हणून केला. या पार्श्वभूमीवर आज धारवाडमध्ये राजकीय प्रश्नांमुळे आर.व्ही.देशपांडे यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

याबाबत धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, पत्रकारांनी राजकीय प्रश्न विचारल्यास मला बोलायचे नाही. मी प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या बैठकीसाठी धारवाडला आलो आहे. आमचा पक्ष मजबूत आहे. भाजपने प्रथम आपल्यातील संभ्रम दूर करावे असा टोला लगावत राज्यात राबविण्यात येणाऱ्या हमी योजना योग्य पद्धतीने राबविण्यात याव्यात याबाबत आपण सूचना केल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, अंगणवाडी सहाय्यकांचे मानधन दरमहा मिळालेच पाहिजे. अंगणवाडी सेविका गरजू आहेत. त्या कठोर आणि निष्ठेने काम करतात. मी बंगळुरूला जाऊन मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास हि बाब आणून देणार आहे. केंद्राकडून एकही पैसा आलेला नाही हे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितलेले खरे आहे असे ते म्हणाले.

Tags: