शाहपूरच्या हुलबत्ते कॉलनीत जमीन संपादित केल्याप्रकरणी भरपाई न दिल्याने , जमीन मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली . उच्च न्यायालयाने महापालिकेला विस्थापित मालमत्ताधारकाला ७५ लाखांची नुकसान देण्याचा आदेश दिला मात्र महापालिकेकडून जमीन मालकाला भरपाई देण्यात आली नाही .
शहापूरच्या हुलबत्ते कॉलनीतील जमीन संपादित केलेल्या व्यक्तीला न्यायालयाने ७५ लाख. रु . नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिल्यानंतर मालमत्ता जप्त करण्यासाठी आलेल्या जमीनमालकाला येथील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याची घटना मंगळवारी घडली.
महापालिकेच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त करणारे वकील इंद्रजित बडवाण्णाचे म्हणाले की, शहापूरच्या हुलबत्ते कॉलनीत १५ वर्षांपूर्वी महापालिकेने जमीन संपादित केली होती. याविरोधात आम्ही हायकोर्टात लढा दिला आणि महापालिकेला 75 लाखांची भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे . एक तर महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा येथील वस्तू जप्त करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा ते न्यायालयाचे उल्लंघन ठरेल.

विस्थापित मालमत्ताधारकाने सांगितले की, 3 वर्षांपासून त्यांच्या 5 जमिनी गेल्या असून महापालिकेने कोणतेही अनुदान दिलेले नाही, त्यामुळे त्यांनी न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई द्यावी यासाठी लढा दिल्याचे असे सांगितले. न्यायालयाने आदेश देऊनदेखील आम्हाला महापालिकेने नुकसान भरपाई दिलेली नाही . अखेर महापालिकेत कोणीही दाद न घेतल्याने, महापालिकेच्या उपायुक्तांच्या कारला नोटीस चिकटवून त्यानी नाराजी व्यक्त केली


Recent Comments